मुदत संपूनही 333 कोटीचे दायित्व कसे?

 

दिनकर पाटील यांचे आयुक्तांना निवेदन

नाशिक: प्रतिनिधी

नाशिक महापालिकेत सद्या प्रशासकीय राजवट असल्याने अधिकारी त्याचा गैरफायदा घेत आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामासाठी तरतूद केलेल्या दायित्वाची मुदत संपलेली असतानाही 333 कोटींचे दायित्व अंदाजपत्रक मध्ये दाखवन्यात आल्याने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी माजी सभागृह नेता दिनकर पाटील यांनी केली आहे, याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन पाठवले आहे,

सन 2023,24 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांसाठी करण्यात आलेली तरतूद असलेल्या दायित्वाची मुदत मार्च 2014 मध्ये संपुष्टात आली आहे असे असतानाही सुमारे 333 कोटींचे दायित्व दळविण्याचे प्रकार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून होत आहे त्यामुळे या सर्व प्रकाराने महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे 2023 2024 च्या अर्थसंकल्पात अनेक त्रुटी असून अंदाजपत्रकात तरतूद केलेली नसतानाही मोठ्या प्रमाणात देयके अदा केली जात आहेत, या सर्व प्रकारची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे, 2023,24 मध्ये दाखवलेलं 43 कोटीचे दायित्व आणि 2014 साली दाखवलेलं333 कोटीचे दायित्व यात 282 कोटींची तफावत आहे, त्यामुळे या प्रकाराची त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी दिनकर पाटील यांनी केली आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *