नाशिक

लासलगाव मार्गे अमेरिकेत ३६० मेट्रिक टन आंबे निर्यात.

२०१९ च्या तुलनेत ३२५ मे टन ने घट

लासलगाव : समीर पठाण

भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही १२ एप्रिल पासून लासलगाव मार्गे सुरू झाली आहे.

या हंगामात ३६० मॅट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून न्यूयॉर्क,कॅलिफोर्निया,सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस,शिकागो याठिकाणी आंबा निर्यात झाली आहे.मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत झाली आहे.लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो,केशर,बदाम, राजापूर,मल्लिका,हिमायत,हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन ३६० मॅट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना झाली सन २०१९ च्या तुलनेत आंबा निर्यातीत ३२५ मे टन ने घट झाल्याचे दिसत आहे.यंदा ऑस्ट्रेलिया मध्ये आंबा निर्यात न झाल्याने निर्यातीत घट झाल्याचे दिसत आहे.

भारतामध्ये विविध प्रकारचे आंब्यांच्या जाती असून त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व इतर देशांना निर्यात देखील मोठ्या प्रमाणात होते. या निर्यातीमध्ये जर आपण विचार केला तर यंदा लासलगाव मार्गे झालेली सगळी निर्यात एकट्या अमेरिकेत झाले आहे.

किरणोत्सर्ग स्त्रोत फूड प्रोसेसिंग देशातील चार प्रमुख यंत्रणाना उपलब्ध करून दिले जात असून यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, गुजरात मधील वापी आणि अहमदाबाद तसेच कर्नाटक मधील बेंगलोर येथील केंद्रांचा समावेश आहे. प्रक्रिया करून आंबे विमानाने पाठवले जात आहे.यात पहिल्यांदा भारतीय केशर आंब्याची समुद्रा मार्गे प्रथमच परदेशवारीही करण्यात यश आले आहे नाशिक येथील हेमंत सानप या निर्यातदाराने धाडस दाखविले आहे त्यामुळे पुढील वर्षी आंबा निर्यातीत आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

२००७ पासून अमेरिकेला झालेली भारतीय आंब्याची आवक

सन निर्यात (टन)

२००७ १५७

२००८ २७५

२००९ १२१

२०१० ९६

२०११ ८५

२०१२ २१०

२०१३ २८१

२०१४ २७५

२०१५ ३२८

२०१६ ५६०

२०१७ ६००

२०१८ ५८०

२०१९ ६८५

२०२० आणि २०२१ कोरोना प्रादुर्भावामुळे आंबा परदेशात न गेल्याने विकिरण प्रकिया झाली नाही.

२०२२ -३६०

Ashvini Pande

Recent Posts

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…

16 hours ago

नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी

इंदिरानगर :  वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…

19 hours ago

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…

19 hours ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…

2 days ago

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५’चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…

3 days ago

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको :  विशेष प्रतिनिधी असे…

5 days ago