विजेचा शॉक लागून 4 जनावरे दगावली

विजेचा शॉक लागून 4 जनावरे दगावली

 

काजी सांगवी ( वार्ताहर) आज सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी चांदवाड तालुक्यातील साळसाने येथील पुंडलिक त्र्यंबक दवांगे
गट न. 308- 1 मध्ये 3 गाई व 1 बैल हे विजेचा शॉक लागून दगावली
या बाबतवृत्त असे की आज सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी पुंडलिक त्रंबक दंवगे यांच्या शेतातील जनावरांच्या शेड पासून अंदाजे 100 फूट अंतरावर ट्रान्सफार्मर आहे सदर ट्रान्सफार्मर चे इन्सुलेटर (चिमणी) जळाल्याने त्याचा करंट पोल आणि आर्थिग साठी असलेली तारीत उतरल्याने 100 फूट अंतरावर असलेल्या जनावरे यांना शॉक लागला संबंधित जनावरे जागेवर ठार झाली अशी माहिती शांताराम दंवगे यांनी दिली चिमणी जळून 10 मिनिट लाईट चालू होती संबंधित शेतकऱ्यांनी वितरण कंपनी ला कॉल करून माहिती दिल्या नंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला तो पर्यंत जनावरे दगावली गेली होती एवढा वेळ शॉटसर्किट होत होते परंतु लाईट ट्रिप झाली नाही लाईट ट्रिप झाली असती तर जनावरे वाचली असती असे संबंधित शेतकऱ्याने गावकरी शी बोलताना सांगितले पावसाळ्या पूर्वी वितरण कंपनी ने दुरुस्तीचे कामे पूर्ण केली पाहिजे म्हणजे असे अपघात घडणार नाही असे तेथील नागरिक आपल्या भावनां व्यक्त करताना सांगत होते या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान हे 4 जनावरे दगावल्याने झाले आहे . संबंधित शेतकऱ्याला वितरण कंपनी कडून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी तेथे जमलेले शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *