सिंहस्थासाठी तीन हजार सीसीटीव्ही प्रस्तावित; सध्या 800 कॅमेरे कायार्र्न्वित

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे विविध विकासकामे होणार आहेत. त्यांपैकी कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या सीसीटीव्हीची कामे प्रस्तावित आहेत. कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात तीन हजार सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथे सध्या अंदाजे 200 सीसीटीव्ही आहेत. तर सिंहस्थासाठी एक हजार सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर असणार आहे. त्यामुळे सुरक्षित कुंभमेळा होण्यास मदत होणार आहे.
नाशिक शहरात सध्या स्मार्ट सिटीच्या वतीने 1,332 सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील विविध भागांत बसवले आहेत. त्यांपैकी 800 सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिक शहरावर एकूण चार हजार 332 सीसीटीव्ही कॅमेर्यांचे लक्ष असणार आहे. यामुळे गुन्हेगारीला अटकाव करण्यास मदत होणार आहे. गर्दीच्या नियोजनासाठीदेखील सीसीटीव्हींचा उपयोग होणार आहे.
नाशिकचा कुंभमेळा सुरक्षित व्हावा, यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. विविध विभागांच्या बैठका घेत कामांची रूपरेषा तयार करण्यात येत आहे. सिंहस्थात तीन हजार सीसीटीव्ही हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस विभागाकडून शहरातील सीसीटीव्ही बसवण्याची आवश्यकता असणार्या ठिकाणांचा प्राथमिक सर्व्हे स्मार्ट सिटीला देण्यात आला. त्यानुसार संबंधित ठिकाणांची माहिती घेत स्मार्ट सिटीच्या वतीने कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. मात्र, प्रत्यक्ष सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांना सुरुवात करण्याच्या आधी शहरातील गर्दीची ठिकाणे, तसेच सीसीटीव्हीची आवश्यकता असणार्या ठिकाणांचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. अंतिम अहवाल पोलीस विभागाकडून घेतल्यानंतरच स्मार्ट सिटीकडून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत शहराची सुरक्षाव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासोबतच सीसीटीव्हीचादेखील उपयोग करत कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला
जाणार आहे.
सिंहस्थासाठी विविध विकासकामांचे नियोजन सुरू आहे. सिंहस्थासाठी प्रस्तावित सीसीटीव्ही स्मार्ट सिटीच्या वतीने बसविण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष काम निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरू होईल. सध्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटीतर्फे लवकरात लवकर कामे सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यात येत आहे.
– सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी
सध्या आठशे सीसीटीव्ही कायार्र्न्वित
शहरात स्मार्ट सिटीतर्फे 1,320 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, त्यांपैकी 800 कार्यान्वित आहेत. इतर सीसीटीव्हीदेखील लवकरच कायार्र्न्वित होणार आहेत.
फायबर ऑप्टिकच्या कामांना सुरुवात
फायबर ऑप्टिकच्या कामांना सुरुवात झाली असून, सध्या निविदाप्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दीड वर्षात चार हजार सीसीटीव्ही बसविण्याचे स्मार्ट सिटीसमोर आव्हान असणार आहे.