मुंबईत महायुतीचा वचननामा; सामान्य मतदारांना दिलासा देण्याचा केला प्रयत्न
मुंबई :
मुंबई मनपा निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या असताना भाजपा-शिवसेना महायुतीकडून वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. लाडक्या बहिणींसाठी बेस्ट भाडे 50 टक्क्यांनी कमी करणार आहोत. यासह अनेक घोषणा महायुतीच्या वचननाम्यात केल्या आहेत. मुंबईकरांनी दिलेल्या 2.65 लाख सूचनांचा विचार करून रविवारी (दि.11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बीकेसीतील एमसीए क्लबमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.
यावेळी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची घोषणा करत ठाकरे बंधूंना याचा विसर पडल्याची टीका केली. तसेच धारावीकरांना धारावीतच घर आणि मुंबईला तोडणार हा निव्वळ विरोधकांचा बिनबुडाचा आरोप असून, यात कोणतंही तथ्य नसल्याचं महायुतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं, मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात बदल घडेल, असं वचन आम्ही देतोय. मुंबईच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय. तसेच गेल्या काही वर्षात मुंबईत बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. मुंबईकर जो नालासोपारा, विरार आणि कल्याण, डोंबिवली, अंबरनाथपर्यंत गेलाय, याला जबाबदार कोण? याचा विचार व्हायला हवा, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. याचबरोबर, मुंबई पागडीमुक्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला, जिथं ओसी मिळत नव्हती, पाणीपट्टी दुप्पट येत होती ते देखील आम्ही बंद केलं. झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न आम्ही पूर्ण करतोय. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एसआरएच्या माध्यमातून 15 हजारांहून अधिक घरं आम्ही तयार करतोय. गेल्या 20 वर्षांपासून भाडं मिळत नसलेल्यांची देखील आम्ही सोय केली. 150 कोटी रुपयांची तरतूद करत गिरणी कामगारांना आम्ही घर देतोय. येत्या काळात मुंबई आणि एमएमआरमध्ये 20 ते 35 लाख घरांची निर्मिती आम्ही करतोय. आम्ही लाखो तरुणांना रोजगार देतोय, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष उपक्रम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापालिकेच्या मदतीने अनेक विशेष उपक्रम साजरे केले जातील. आम्ही बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ करणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी बेस्ट भाडे 50 टक्क्यांनी कमी करणार आहोत. लघू उद्योजकांना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. जुन्या इमारतींच्या पुनर्विकात कोणतेही अडथळे न आणता पुढील पाच वर्षासाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देऊ, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं की, इतर कुणीही वचननामा दिला तरीही त्यांच्यापेक्षा आमचा ट्रॅक रेकॉर्ड मोठा असेल. पुढील पाच वर्षानंतर आम्ही काय-काय केलंय, याचा एक स्वतंत्र रिपोर्ट मुंबईसमोर येईल. विमानतळामुळं काही ठिकाणी उंचीची अडचण निर्माण होतेय, याच्यावर काम करतोय. रडार सिस्टीमची ठिकाण बदलता येईल का?, यासाठी प्रयत्न करतोय. आम्ही कधीही मुंबईकरांना मुंबईबाहेर जाऊ देणार नाही. सर्व पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून आम्ही करतोय. धारावीचा विकास करताना, 350 चौ. फूटापर्यंतची घर आम्ही धारावीतच देणार आहोत. महानगरपालिकेत काम करणार्या सफाई कामगारांसाठी आम्ही घरं देतोय. महापालिका शाळाही कौशल्ययुक्त करतोय. तसेच मराठी भाषेसाठी विशेष तरतूद करणार आहोत, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
50 percent discount for women at ‘Best’
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…