पाच लाखांच्या खंडणीसाठी तो थेट बॉम्बच घेऊन गेला
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील गुळवंच येथे एकाने गावठी पेट्रोल बॉम्ब व सुतळी बॉम्ब नेऊन एका किराणा दुकानदाराला धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकाने आपल्या सोबत आणखी एकाला घेऊन तेलाच्या १५ किलोच्या रिकाम्या डब्यात ठेवलेले हे दोन बॉम्ब घेऊन दोघे गावातीलच आंबेकर यांच्या किराणा दुकानात गेले. तेथे छऱ्याची गावठी पिस्तूल दाखवत आंबेकर यांच्याकडे ५ लाखांची खंडणी मागितली.
खंडणी दिली नाही तर बॉम्बने दुकान उडवण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० च्या दरम्यान घडल्याचे समजते. भयभीत झालेल्या आंबेकर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांच्या भीतीने धमकी देणारा पळाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बची खात्री केली. त्यानंतर तातडीने मालेगाव येथून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी दोन्ही बॉम्ब आज सकाळी निकामी केल्यानंतर पोलीस मुख्य संशयित विष्णू भाबड याचा शोध घेत आहेत. भाबड याने रात्रीचा प्रकार घडल्यानंतर घरी जाऊन झोपेच्या गोळ्या घेतल्याचे समजते. भाबड याने स्वतः बॉम्ब बनवला की दुसऱ्या कुणाकडून बनवून घेतला याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…