जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

 

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक ७.५० तर देवळाली मतदारसंघात सर्वात कमी ४.४२ टक्के मतदान
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघात आज बुधवार , दि २० रोजी सकाळी ७वा . मतदानाला अत्यंत शांततेत सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात दोन तासात सरासरी ६. ८९ टक्के मतदान झाले . नाशिक शहरात पश्चिम मतदार संघात ६ .२५ टक्के ,पूर्व नाशिक पूर्व मतदार संघात ६ . ४३ टक्के , तर नाशिक मध्य मतदार संघात ६.५० तर देवळाली मतदारसंघात ४. ४२ टक्के मतदान झाले आहे .दरम्यान नांदगाव मतदार संघामध्ये नांदगाव मनमाड रस्त्यावर सुहास कांदे आणि समीर भुजबळ या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे समजते .
आज सकाळी ७ वाजता मतदानास प्रारंभ झाला तेव्हा थंडीमुळे सर्वच मतदार केंद्र मतदान केंद्रावर अत्यंत तुरळक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झाले होते . नंतर मात्र हळूहळू थोड्याफार रांगा दिसू लागल्या होत्या . नाशिक पश्चिम मतदार संघामध्ये सिडको म्हणजे नवीन नाशिक भागात बहुतांश मतदारसंघांमध्ये मतदार पहाटेच्या वेळी मतदान केंद्रावर जाताना दिसून आले . मात्र त्याच वेळी अनेक मतदारांचे मतदारांना आपले मतदान नेमके कोणत्या केंद्रावर आहे याचा संभ्रम निर्माण झाला होता . कारण मतदानाच्या चिट्ठ्यांवर असलेल्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तेथील आपली नावे नसल्याचे त्यांना आढळून आले . पुन्हा त्यांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन मतदान करावे लागले .काही मतदारांची त्रिस्थळी यात्रा झाली , नाशिक पश्चिम मतदार संघामध्ये उत्तमनगर ‘ मोरेमळा , महाजननगर ‘ जयहिंद कॉलनी, ओम कॉलनी , इंद्रप्रस्थ कॉलनी , उपेंद्र नगर भागातील मतदारांची नावे पूर्वी कामटेवाडे परिसरातील डीजीपी नगर मधील विखे पाटील शाळेत होती ‘ मात्र आता अनेक मतदारांची नावे ही उत्तमनगर भागातील शालिनीताई बोरसे शाळेत तसेच डी .एस . आहेर शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रात आलेली आहेत . त्यामुळे बहुतांश मतदार सकाळी नेहमीप्रमाणे विखे पाटील शाळेत मतदान करण्यासाठी गेले असता तेथे त्यांची नावे नसल्याचे आढळून आले . त्यामुळे पुन्हा त्यांना परत माघारी फिरून शालिनीताई बोरसे आणि डी एस आहेर शाळेमधील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावा लागला . सकाळी मतदान करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता . तसेच काही महिला मतदार ,तरुण – तरुणी आणि नागरिकांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला .विशेष म्हणजे शहरातील विविध मतदार संघामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क सकाळी बजावला . यामध्ये विभागीय महसुल आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात समावेश होता .
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नेण्यासाठी उत्साहात मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघांसाठी ४९२२ मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. एकूण ५० लाख ६१ हजार १८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रात भ्रमणध्वनी नेण्यास प्रतिबंध आहे. नागरिकांनी निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन प्रशासनासह विविध सामाजिक संस्थांनी केले आहे.
यंत्रणेने आदल्या दिवशी सर्व तयारी पूर्णत्वास नेत मतदानाची सज्जता केली आहे. जिल्ह्यात २६ लाख १४ हजार ९६ पुरुष, २४ लाख ४६ हजार ९६८ महिला आणि १२१ तृतीयपंथी मतदार आहेत. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक (४८३४९५) तर सर्वात कमी मतदार इगतपुरीत (२८०५५९) आहेत. प्रत्येक मतदार संघात तीन संपूर्ण महिला संचलित मतदान केंद्र, एक संपूर्ण अपंग कर्मचारी संचलित मतदान केंद्र आणि तीन संपूर्ण युवा कर्मचारी संचलित मतदान केंद्र देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेच्या संनियंत्रणासाठी ३२८० केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे मतदानासाठी बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींची नावे मतदार यादीत आहेत, मात्र शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्ताने ते अन्य ठिकाणी राहत असल्यास तिथे त्यांना पगारी रजेचा अधिकार आहे. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी सहायता कक्ष आहे. केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदारांना अनुक्रमांक शोधून देण्यास मदत करतील. तसेच मतदारांना व्होटर हेल्पलाईन ॲपमधून त्यांचे मतदान केंद्र, मतदार यादी भागातील अनुक्रमांक माहिती करून घेता येईल. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, सावलीसाठी व्यवस्था, माहितीदर्शक फलक, प्रसाधनगृह, खुर्ची, पाळणाघर, स्वयंसेवक उपलब्ध करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ६४.२१ टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नेण्यासाठी उत्साहात मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

यांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रशांत जाधव ( भाजप शहर अध्यक्ष)

 

Bhagwat Udavant

Recent Posts

चोरी झालेली बाइक सापडली

शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून…

8 hours ago

सर्व्हर डाऊनमुळे इंधन पुरवठा ठप्प; वेबसाइट हॅकची चर्चा

वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू मनमाड : प्रतिनिधी मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान…

8 hours ago

पिंपरखेडला बोगस डॉक्टरला अटक

नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त पळाशी : वार्ताहर अ‍ॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या…

8 hours ago

गोंदेजवळ आयशरची कारला धडक; 5 म्हशी ठार

सिन्नर : प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्‍या आयशरने डाव्या…

9 hours ago

दिंडोरी, सुरगाण्यात अवकाळी पावसाचा कहर

वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा,…

9 hours ago

एरंडगाव शिवारात युवकाचा मृत्यू

येवला : तालुक्यातील एरंडगाव शिवारातील विहिरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सतीश रामकृष्ण जाधव…

9 hours ago