अंबड पोलिसांची मोठी कारवाई
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरात अमली पदार्थविरोधी मोहिमेत महत्त्वाची कारवाई करत अंबड पोलिसांनी 7.8 किलो गांजाची बेकायदेशीर वाहतूक उधळून लावत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई 24 मे रोजी रात्री जुन्या सिडकोतील बडदेनगर येथे करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे व पोलीस शिपाई संदीप भुरे यांच्या पथकाने सापळा रचत संशयित आरोपी बाबुराव गोविंद आव्हाड (वय 54) व संदीप बाळू सांगळे (वय 27) हे दोघेही उत्तमनगर, सिडको नाशिक येथील असून मूळ गाव सावरगाव पळसे, ता. नाशिक यांना ताब्यात घेऊन संशयितांची झडती घेतली असता तपासात 47 हजार रुपये किंमतीचा 7.8 किलो गांजा चार गोण्यांमध्ये मिळून आला असून दोघांच्या अंगझडतीतून तर्ळीें कंपनीचे प्रत्येकी दोन मोबाईल फोन व संबंधित सिमकार्डसह जप्त करण्यात आले आहेत.
प्राथमिक तपासात या गांजाची वाहतूक विक्रीच्या उद्देशाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीस ठाणे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…