रवींद्र देवधर,दीपक जोशी यांनी केले मार्गदर्शन
नाशिक: प्रतिनिधी
जीएसटीसंदर्भातील किचकट तरतुदी आणि उणिवा याबाबत आयमाच्या के.आर.बूब सभागृहात आयोजित महत्वपूर्ण चर्चासत्रात विख्यात कर सल्लागार रवींद्र देवधर आणि दीपक जोशी यांनी उद्योजक आणि व्यावसायिकांना सोप्या शब्दांत मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ,कर समिती चेअरमन नितेश नारायणन, को चेअरमन सुमीत बजाज,अरिफ खान मन्सुरी आदी होते. आयमा व दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकॉउंटस ऑफ इंडिया नाशिक-ओझर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ केले.उद्योजक आणि व्यावसायिकांना जीएसटीबाबत अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या अनेक किचकट तरतुदी असून त्याचे सर्वांना सखोल ज्ञान मिळावे व येणाऱ्या समस्यांना सुलभ रीत्या सामोरे जाता यावे यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे पांचाळ यांनी यावेळी सांगितले.
विख्यात कर सल्लागार रवींद्र देवधर आणि दीपक जोशी यांनी जीएसटीसंदर्भात असलेल्या उणिवा,त्याबाबतचे नियम,त्यात झालेले बदल त्यात करावयाची सुधारणा,नियमांचे स्पष्टीकरण, निर्णय,अपील,करांबाबतचे विवाद,जीएसटीकडून येणाऱ्या नोटिसांना कसे सामोरे जावे,आपला बचाव कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना या दोघांनीही समर्पक उत्तरे दिली.नोटिसा आल्यानंतर त्याने घाबरून जाऊ नका.नोटीस केव्हा पाठवली यापेक्षा ती तुम्हाला केव्हा मिळाली याला विशेष महत्व आहे.नोटीस देवनागरी भाषेत पाठवा अशी मागणीही तुम्ही करू शकता.नोटिसीला मुद्देसूद उत्तरे द्या.तुम्ही दिलेल्या उतारानंतर त्याची वैयक्तिक सुनावणी होणे गरजेचे असते.त्याशिवाय संबंधित ऑथर्टीला ऑर्डर पास करता येत नाही याची आठवणही देवधर आणि जोशी यांनी उपस्थितांना यावेळी करून दिली.आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले.चर्चासत्रास 70हून अधिक उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा : आयमाच्या पुढाकाराने मंगळवारी रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत चर्चासत्र
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…