तालुक्यातील चिमुकल्यांची होतेय हेळसांड, काही ठिकाणी बसतात उघड्यावर
अण्णासाहेब बोरगुडे : निफाड
एकात्मिक बालविकास प्रकल्प एक, दोन आणि तीन प्रकल्पांतर्गत तालुक्यात असलेल्या 471 अंगणवाड्यांपैकी 78 अंगणवाड्या खासगी व इतर ठिकाणी भरतात. चिमुकल्यांना शासकीय इमारतीअभावी काही ठिकाणी उघड्यावर तर काही ठिकाणी खासगी जागेत बसावे लागते.
तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे एक, दोन व तीन प्रकल्प आहेत. प्रकल्प एक अंतर्गत 157, प्रकल्प दोनअंतर्गत 175, तर प्रकल्प तीन 139 अंगणवाड्या आहेत. निफाड- प्रकल्प-1 अंतर्गत 157 अंगणवाड्या असून, 11 अंगणवाड्या इतर जागेत भरतात. प्रकल्प -2 अंतर्गत 175 अंगणवाड्या असून, त्यातील 43 अंगणवाड्या इतर ठिकाणी भरविल्या जातात व प्रकल्प 3 अंतर्गत 139 अंगणवाड्या असून, त्यातील 24 अंगवाड्या इतर ठिकाणी भरतात.
अंगणवाडी हे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा एक भाग आहे. ही योजना ग्रामीण भागात महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध सेवा पुरवते. अंगणवाडीमध्ये अंगणवाडीसेविका आणि अंगणवाडी मदतनीस काम करतात. 0 ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पोषण आहार, आरोग्य तपासणी आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण पुरवते. तसेच गर्भवतींना पोषण आहार आणि आरोग्यसेवा पुरवते. मातांना बालकांच्या संगोपनाबद्दल मार्गदर्शन करते, लसीकरण मोहिमा राबवते. प्राथमिक आरोग्यसेवा पुरवते. महिला आणि बालकांच्या आरोग्य आणि विविध योजनांविषयी जनजागृती करते. अंगणवाडीचे प्रमुख कर्मचारी, जे बालके आणि मातांना मार्गदर्शन करतात.
अंगणवाडीमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाला मदत होते. बालकांना योग्य पोषण आहार आणि आरोग्य सेवा मिळाल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होते.
निफाड प्रकल्प 1– स्वमालकीची इमारत नसलेल्या अंगणवाड्या (एकूण 11)- शिवरे, गाजरवाडी रोड, नांदूरमधमेश्वर, सोनेवाडी- निफाड रोड, धानोरे, खेडला कारवाडी, लासलगाव आदिवासी वस्ती, लासलगाव अहिल्या चौक, लासलगाव राजवाडा, लासलगाव शिंपी गल्ली, ब्राह्मणगाव पोटे वस्ती, लासलगाव विद्यानगर. 2025-25 मध्ये मंजूर अंगणवाड्या- लासलगाव- होळकरवाडी, लासलगाव-रेल्वे स्टेशन.
निफाड प्रकल्प- 2 : स्वमालकीची इमारत नसलेल्या अंगणवाड्या (43) – मिलिंदनगर, श्रमिकनगर 1, श्रमिकनगर- 2, आंबेडकरनगर 1, आंबेडकरनगर 2, रामजीनगर, लोहार गल्ली, शेलार मळा, दिक्षी -3, बेडकर वस्ती, पिंपळस 2, आनंदनगर -3, भेंडाळी 2, म्हाळसाकोरे 4, शिंगवे 4, वाल्मीकनगर 2, विजयनगर 2, माळीवाडा, पंचशीलनगर, आदिवासी वस्ती, तुळजाभवानी चौक, समतानगर, भडके वस्ती, कासार लेन, राणा प्रताप चौक खेरवाडी, दत्त मंदिर, मारुती मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, गंगानगर, उपकेंद्राजवळ, बेरवाडी, बेरवाडी-निपाणी रोड, तामसवाडी 2, ब्राह्मणवाडी मिनी, फटांगळे वस्ती, झोमन वस्ती, गावठाण, हळदे वस्ती, शेरे वस्ती, कारखाना रोड कुरुडगाव 2, सुंदरपूर, सन 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या अंगणवाड्या – बुरके वस्ती, नागापूर, गणपीर मळा.
निफाड प्रकल्प- 3 : स्वमालकीची इमारत नसलेल्या अंगणवाड्या (24)- कारसूळ-3, लोणवाडी- 2, देवपूर 2, नांदुर्डी-3, नांदुर्डी-4, नांदुर्डी- 5, नांदुर्डी 6, कोकणगाव 5, शिरसगाव 4, पंचकेश्वर 2, उगाव 3, उगाव 6, उगाव 8, रौळस 1, पालखेड खैरे वस्ती, पालखेड जगझाप वस्ती, सारोळे खुर्द 1, सावरगाव 3, रानवड के. के. नगर, के. के. नगर पेट्रोलपंप, उंबरखेड 4, बांधकाम चालू असलेल्या अंगणवाडी- 2 -बेहड- 2, कोकणगाव- 4,
मंजूर अंगणवाड्या- 1- अंतरवेली.