महाराष्ट्र

80 हजार कोटींचे करार

80 हजार कोटींचे करार
दावोस आर्थिक परिषद : 66 हजार जणांना मिळणार रोजगार
दावोस : स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत परदेशातील 23 कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे 80 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. यामुळे महाराष्ट्रात सुमारे 66 हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
काल झालेल्या विविध गुंतवणूक करारांमध्ये 55 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश आहे.
दावोस येथील महाराष्ट्र लाउंजमध्ये झालेल्या सामंजस्य करारात एकूण 30 हजार 379 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यामुळे महाराष्ट्रात सुमारे 66 हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत एकूण 10 आवृत्या आयोजित करण्यात आल्या असून त्यामाध्यमातून आजपर्यंत 121 सामंजस्य करार झाले आहेत. त्यातून राज्यात एकूण 2.15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. याद्वारे सुमारे 4 लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
विविध सामंजस्य करारावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते.
हे झाले करार
इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड या सारख्या प्रमुख वस्त्रोद्योग कंपन्या अनुक्रमे नागपूर आणि कोल्हापूर या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये गुंतवणूक करणार आहे.
जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आयटी कंपनी मायक्रोसॉफ्ट पुण्यात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी रक्कम 3200 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
इंडोनेशियातील एक अग्रगण्य लगदा आणि कागद उत्पादक कंपनी आशिया पल्प अँड पेपर (एपीपी) ची संस्था सिनर्मास पल्प अँड पेपर प्रायव्हेट लिमिटेड रायगडमध्ये कागद आणि लगदा उत्पादनासाठी 10 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
हॅवमोर आइसक्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुण्यात आइस्क्रीम तयार करण्यासाठी नवीन युनिट सुरू करणार आहे. यामुळे फूड अँड ऍग्रो प्रोसेसिंगलाही वाव मिळणार आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

श्रमिकनगरला टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्या

नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…

20 hours ago

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…

2 days ago

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

4 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

4 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

4 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

5 days ago