शेती वापराचा 90 मेट्रिक टन युरिया खासगी कंपनीच्या घशात

दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल

दिंडोरी : प्रतिनिधी

तालुक्यातील रामशेज येथील एका खासगी कंपनीने शेतीसाठी वापरला जाणारा युरिया औद्योगिक वापर करत असल्याच्या कृषी विभागाच्या मोहिमेत उघड झाल्याने कंपनी व्यवस्थापकासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, रामशेज येथील गट नंबर ३०५/१३ मध्ये असलेल्या पशुखाद्य बनविणाऱ्या एका खाजगी कंपनीची तपासणी रसायन व खते मंत्रालयाचे आवर सचिव चेतराम मीना व जिल्हा परिषद मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी यांनी केली असता तेथे युरिया खरेदीचे परिपूर्ण दस्तावेज, साठा नोंदवही, खरेदी किंमत, युरिया दैनंदिन वापर नोंदवही, कंपनी प्रशासनाकडून मागूनही मिळत नसल्याने संशय आला, त्यानंतर पुन्हा कंपनीमध्ये तपासणी केल्याने 50 किलो बागेतील युरियाची किंमत 24 ते 28 रुपये किलो असल्याचे लक्षात आल्याने युरियाची तपासणी केली असता टेक्निकल ग्रेड औद्योगिक वापरासाठीचा युरिया नसून शेती वापराचा अनुदानित युरिया असल्याचे निदर्शनास आल्याने 90 मेट्रिक टन वजनाच्या 50 किलो वजनाच्या १८०० बॅगा किंमत 22 लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज सीलबंद करून दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  उप निरीक्षक सुदर्शन आवारी करीत आहे,

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago