नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत काल झालेल्या हिंदीच्या पेपरला विभागातील 973 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. दरम्यान, इंग्रजीच्या पेपरमध्ये झालेल्या चुकांचा सिलसिला काल हिंदी पेपरलाही कायम राहिला. हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1,2,1,2 असे देण्यात आले आहेत. ते 1,2,3,4 असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1,1,1,1 असे क्रमांक देण्यात आले आहेत. हे 1,2,3,4 असे असायला हवे होते.
नाशिक विभागात हिंदीच्या पेपरसाठी 12596 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12444 विद्यार्थी हजर होते. तर 192 विद्यार्थी गैरहजर होते. धुळे जिल्ह्यात 4683 विद्यार्थी नोंदणी झाले होते. मात्र 4493 विद्यार्थी हजर होते. तर 203 विद्यार्थी गैरहजर होते. जळगाव जिल्ह्यात 12908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12631 विद्यार्थी हजर होते. तर 375 विद्यार्थी गैरहजर होते. नंदुरबार जिल्ह्यात 5041 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4845 विद्यार्थी उपस्थित होते. तर 203 विद्यार्थी गैरहजर होते. काल हिंदीच्या पेपरला एकही कॉपी प्रकरणाची नोंद झाली नाही
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…