ओझर : वार्ताहर
वोकार्ट हाँस्पिटलचा रिसेप्शनिष्ट बोलतो असे सांगून आज्ञात मोबाईल धारकाने एका एअरफोर्स अधिकार्याच्या व्हाँट्सअप नंबरवर
टाकलेल्या लिंक मध्ये अधिकारीने फोन पे सह युपीआय फोनची माहिती भरल्यानंतर आज्ञात मोबाईल धारकाने अधिकार्याच्या बचत खात्यातून 98 हजार 500 रुपये अवैधरित्या आँनलाईन ट्रान्सफर करुन घेत तोतयेगिरी करून या अधिकार्याची फसवणूक केली आहे
दिनांक 26 मार्च 23 रोजी सकाळी 11.30 ते
दिनांक 27 मार्च रोजीच्या सकाळी 6.47 वाजेच्या दरम्यान सुदेशपाल सोहनलाल एअर फोर्स ज्युनियर वारंट ऑफिसर एअरफोर्स स्टेशन ओझर नाशिक.यांना मानदुखीचा
त्रास होत असल्याने त्यांनी गुगल वर वोकार्ट हॉस्पीटलचा नंबर मागितला असता गुगलने 6290792586 हा नंबर दिल्यावर सुदेशपाल यांनी सदर नंबरवर कॉल केला असता अज्ञात मोबाईल धारकाने काँल घेत वोकॉर्ट हॉस्पीटल नाशिकचा रिसेप्शनिस्ट बोलतो असे सांगुन सुदेशपाल यांना ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागेल असे सांगुन अज्ञात इसमाने त्याचे व्हॉट्सअप नंबर 6290792586 यावरुन सुदेशपाल यांचे व्हॉट्सअप नंबर 7204895621 वर
https://hospitalappointmen६. wxsite.com/m y-site लिंक टाकली सदरची लिंक सुदेशपाल यांनी ओपन करुन त्यांनी त्यात माहीती भरुन स्वताचा मोबाईल नंबर तसेच फोन पे नंबरचा युपीआय पीन 220810 हा टाकल्यानंतर सुदेशपाल यांच्या खात्यातून ऑनलाईन 5 रुपये पेमेंट फी घेवून अपॉईंटमेंट फिक्स झाली असे सांगुन सुदेशपाल यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर दि. 27 मार्च 23 रोजी अज्ञात इसमाने फिर्यादीचे स्टेट बैंक ऑफ इंडीया चे बचत खाते क्रमांक 30690285676 या खात्याचे फोन पे अप्लीकेशनवरुन 98 हजार पाचशे रुपये शाजहान रेफरन्स नं. 308698131236 यावर अवैधरित्या ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेवुन तोतयेगिरी करुन सुदेशपाल सोहनलाल यांची 98 हजार 500 रुपयांची फसवणुक केली असल्याची तक्रार सुदेशपाल सोहनलाल यांनी काल नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अधिक. तपास पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन नाशिक ग्रमीण करीत आहेत