पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी तिघांनी भरले अर्ज

 

 

 

भाजपकडून आज उमेदवार घोषित होण्याची शक्यता

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

नाशिक पदवीधर मतदारसंघ निषणुकीसाठी अखेर तिघा उमेदद्वारांनी विभागीय आयुक्त कार्यलयात अर्ज दाखल केले आहे. यात धुळे जिल्हा्यातून दोन आणि नाशिक मधून एक याप्रमाणे अर्ज भरण्यात आले आहे. दरम्यान  काँगेसकडून डॉ. सुधीर तांबे यांचे नाव निश्चित मानले जात आहे.  त्यादृष्टीने त्यांनी काही महिन्यापूर्वीच तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे मात्र भाजपा कडून अद्याप ही नाव निश्चित नं झाल्याने भाजपातच संभ्रमावस्था आहे.भाजपाकडून राजेंद्र विखे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात असले तरी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

 

दरम्यान मंगळवारी धुळे येथील जुबेर नासिर शेख, शुभांगी भास्कर पाटील तर नाशिक मधून  सोमनाथ नाना गायकवाड अशा या तिघा अपक्षानी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे अर्ज सादर केले.

 

पाचव्या दिवशी या उमेदवारांनी त्यांचा  उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जाहीर झालेल्या निवडणूक साठी 46 उमेदवारांनी 97 उमेदवारी अर्ज नेले असून मंगळवारी तीन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या कडे सादर केला आहे.

 

यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी रमेश काळे,उपायुक्त उन्मेष महाजन,तहसीलदार,तीन नायब तहसीलदार व लेखा अधिकारी उपस्थिती होते.

 

पदवीधर निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन भरण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. सोमवार पर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. त्मे

 

दवार शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून भाजपचा उमेदवार अद्याप ठरला नसल्याने नेमका नाशिकच्या निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. बुधवारी भाजपचा नाशिक पदवीधर मतदार संघाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

भाजपाकडे राजेंद्र विखे , मीनाक्षी  पाटील , धनंजय विसपुते ही नावं आहेत. यापेक्षाही वेगळ काहीतरी नाव येऊ शकते. विधान परिषदेच्या 30 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी पाच पैकी तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केली. मात्र यात नाशिक पदवीधर संघांसाठी उमेदवाराची घोषणा केली नाही.

 

 

 

चौकट…

 

 

भाजपकडून तांबेना ऑफर?

 

 

भाजपकडून काँग्रेसचे तरुण नेते सत्यजित तांबे यांना देखील उमेदवारी दिली जाण्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी तांबे यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे तांबे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यावरूनही चर्चा सुरू झाल्या होत्या. या मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत. यावेळीही त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचे ठरले आहे. मात्र त्यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.  त्यामुळे भाजपचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निडणुकीचे चित्र पुढे येणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *