नाशिक: प्रतिनिधी
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी (मविआ) ची उमेदवारी अखेर काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांना जाहीर झाली आहे, भारतीय जनता पार्टी ची उमेदवारी अजून कुणाला द्यायची यावर अजून खल सुरू आहे, . सलग तीन वेळा पदवीधरांचा कौल मिळवलेल्या डॉ. तांबे यांची लढत भाजप-शिंदे गट युतीच्या उमेदवारासोबत होणार आहे.
भाजपकडून अनेक उमेदवार इच्छुक असले तरी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, पाच जिल्ह्यांतील मतदारांना गवसणी घालणार्या या मतदारसंघाच्या प्रतिनिधीत्वासाठी अहमदनगरमधील उमेदवारांतच लढत होण्याची चिन्हे आहेत. विखे विरुद्ध थोरात असा संघर्ष पुन्हा दिसणार आहे,