नाशिक पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट
पुत्रासाठी पित्याची माघार
डॉ, तांबे ऐवजी सत्यजित तांबे रिंगणात
नाशिक; नाशिक पदवीधर निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या, कॉंग्रेस ने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली असताना त्यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही, त्याऐवजी त्यांचे पूत्र सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, भारतीय जनता पार्टी ने देखील शेवट पर्यंत उमेदवार जाहीर केला नाही, त्यामुळे आता सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पार्टी की काँग्रेस पाठिंबा देतात याकडे लक्ष लागले आहे,