अपघातातील जखमींवर सुरू आहेत येथे उपचार

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाच्या जवळ प्रवाशांना घेऊन जाणारी भरधाव बस (एम.एच04 एफके2751) उलटली.
या भीषण अपघातावेळी एकूण 45 प्रवासी बसमध्ये होते.त्यातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी सात जणांची ओळख पटली असली तरी तीन जणांची अद्याप ओळख पटली नाही. तर जखमींवर
मातोश्री हॉस्पिटलमध्ये तीन, डॉ. साळुंखे हॉस्पिटलमध्ये एक, यशवंत हॉस्पिटलमध्ये सोळा अशा एकूण 20 अपघातग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.तर सिन्नर रुग्णालयातून चार प्रवाशांना उपचार नंतर सोडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *