नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक
नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यापैकी सात उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे नामंजूर झाली आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली.
यांचे अर्ज ठरले बाद
गायकवाड सोमनाथ नाना
भागवत धोंडीबा गायकवाड
सुनील शिवाजी उदमले
इंजि. शरद मंगा तायडे
राजेंद्र मधुकर भावसार
यशवंत केशव साळवे
छगन भिकाजी पानसरे
एकूण नामनिर्देशन उमेदवार 29
ना मंजूर उमेदवार 7
शिल्लक उमेदवार 22
नामनिर्देशन पत्रे दाखल करणाऱ्या 29 उमेदवारांपैकी सात उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे नामंजूर झाली असून 22 उमेदवार शिल्लक आहे