निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमीत्त सिटीलिंकच्यावतीने जादा बस
नाशिक : प्रतिनिधी
श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमीत्त लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर याठिकाणी श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत आहे. पायी दिंडी आधीच त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असल्या तरी बुधवारी हजारो भाविक त्र्यंबकेश्वर याठिकाणी दर्शनासाठी जाणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत सिटीलिंकच्या वतीने तपोवन आगरातून 15 बसेसच्या माध्यमातून 106 बस फेर्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात तर नाशिकरोड आगारतून 10 बसेसच्या माध्यमातून 60 बसफेर्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात. या नियमित बसफेर्याव्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर यात्रोत्सौवानिमीत्त तपोवन आगारातून 6 बसेसच्या माध्यमातून 48 फेर्या तर नाशिकरोड आगारातून 4 बसेसच्या माध्यमातून 32 फेर्या अश्या एकूण 10 जादा बसेसच्या माध्यमातून 80 जादा बसफेर्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
बुधवार (दि18) व गुरूवार (दि19 ) जानेवारी असे दोन दिवस जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. दोन दिवस तपोवन आगारातून एकूण 21 बसेसच्या माध्यमातून 154 बसफेर्या तर नाशिकरोड आगारातून 14 बसेसच्या माध्यमातून 92 बसफेर्या नियोजित आहे. एकूणच दोन दिवसांत रोज 246 बसफेर्या भाविकांच्या सेवेसाठी त्र्यंबकेश्वर मार्गावर कार्यरत असणार आहे.
जास्तीत जास्त भाविकांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.