सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीची चणचण

 

तेराशे कोटींची कामे मंजूर, मात्र हातात दीडशे कोटीच

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाची तब्बल 1 हजार 300 कोटींच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. मात्र निधीच नसल्याने हातात मंजूर कामांच्या अवघे दीडशे कोटीं रुपयेच असल्याने कामे तरी कशी करावी. असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आ वासून उभा आहेे. सध्या आचारसाहितेमूळे सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे बंद आहे.
राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांहकाम विभागाला मिळणाऱ्या निधीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. कोरोनाचे संकट आल्याने बांधकाम विभागाचा निधी आरोग्य विभागाकडे वळवण्यात आला. त्यामुळे कोरोनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी मिळाला नाही. त्यावेळी जिल्हयातील विविध कामे खोळ्ंबल्याचे दिसून आले. कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्यानंतर विविध कामांना मंजूरी दिली. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या कामांवर स्थगिती घातली. नंतरच्या काळात ही स्थगिती उठवली देखील. दरम्यान सध्याच्या घडीला सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीची चणचण असल्याचे दिसते आहे. ठेकेदारांनी केलेल्या कामांचे पैसे त्यांना मिळाले नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा, राज्य महामार्ग बांधणे, रस्ते दुरुस्ती करणे, पूल बांधणे, शासकीय इमारतींचे बांधकाम, त्यांची देखभाल दुरुस्ती, उद्याने, शासकीय विश्रामगृह आदीसंबंधीत असलेली बांधकामे व त्यांची दुरुस्ती सा.बांधकाम विभागाकडून केली जाते. शासकीय इमारतीसह रस्त्यांवर मोठया प्रमाणात कोट्यावधींचा ख्रर्च्व केला जातो. मागील दोन वर्षात निधी अभावी जिल्हयातील विविध कामांना फटका बसल्याचे दिसून आले. राज्यात महाविकास आघाडी काळात विकास कामे रखडल्याचा आरोप वारंवार केला जात होता. काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तातर झाल्यानंतर जास्तीत जास्त निधी सार्वजनिक बांधकामाला मिळ्ण्याची शक्यता आहे. मार्च मध्ये राज्याचे बजेट होणार आहे. त्यावेळी नाशिक सार्वजननिक बांधकाम विभागासाठी चांगला निधी मिळाला तरच जिल्हयात रस्त्यांची कामे होउ शकतील.

 

जिल्हयासाठी तेरासे कोटींची कामे मंजूर असली तरी दीडशे कोटींची कामे होतील एवढाच निधी सध्या शिल्लक आहे. मार्च महिन्यात चांगला निधी मिळू शकतो.

प्रशांत सोनवणे, अधिक्षक अभियंता, सा. बा. विभाग नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *