नाशिकरोड : प्रतिनिधी
येथील ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसिद्धिप्रमुखपदी सामाजिक कार्यकर्ते शंतनू निसाळ यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत निसाळ यांची निवड करण्यात आली.
सकल महाराष्ट्राला हेवा वाटणाऱ्या नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीची यंदा ही मोठी तयारी सुरू झाली आहे. नाशिकरोड व जेलरोड येथे शिवजयंतीदरम्यान | विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शिवभक्त, नागरिक व प्रसारमाध्यम यांना या कार्यक्रमाबाबत माहिती व्हावी.याकरिता शंतनू मिसाळ यांची नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीच्या प्रसिद्धप्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा लवटे, कार्याध्यक्ष शांताराम घंटे, समन्वयक शिवाजी सहाणे, माजी प्रभाग सभापती, नगरसेवक विशाल संगमनेरे, विक्रम कोठुळे, किशोर जाचक, विकास भागवत, बापू सापुते, योगेश भोर, साहेबराव शिंदे, नितीन चिडे, कैलास मैद, संतोष कांबळे, दर्शन सोनवणे, राहुल बेरड, गिरीश लवटे, प्रशांत कळमकर आदींनी त्याचे अभिनंदन केले.