सिन्नर प्रतिनिधी
तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील साई टेक लिमिटेड या कंपनीस आग लागल्याची घटना घडली आहे…
सिन्नर नगरपालिकेचे व एमआयडीसीचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आगीत अद्याप कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तर कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.