विहितगांवचा मथुरा चौक ठरतोय डेंजरझोन

गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग च नाही
नाशिकरोड : प्रतिनिधी
 विहितगाव येथील मथुरा चौक वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला असून या चौकात वाहनांच्या वेगावर मर्यादा राहावी. याकरिता येथे तत्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिकांनी केली आहे.
विहितगाव ते पाथर्डी या हा अती वर्दळीचा मार्ग आहे. याशिवाय अनेकजण शॉर्टकट म्हणून या रस्त्याने ये जा करतात. मात्र अनेक अवजड वाहनांचा वेग खूपच असतो त्यांच्या वर कुठलेही नियंत्रण नाही. तसेच इतरही छोटे वाहनधारक आणि काही दुचाकी स्वारांचा वेग खूपच असतो. त्यामुळे या मार्गावर अनेकदा अपघात होत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर कुठेही गतिरोधक व दुभाजक नाहीत. त्यामुळे अतिवेगात येणाऱ्या वाहनांची समोरासमोर धडक होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. दोन महिन्यापूर्वी केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी याच ठिकाणी अपघातात मृत झाला होता. किरकोळ अपघात होऊनबऱ्याच जणांना अपंगत्वही आले आहे. या मार्गाने शाळकरी मुले, शेतकरी, कामगार, यांसह विहितगाव येथील विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी पायी येत असतात. त्यातच हा रस्ता रुंद असल्याने तो ओलांडणे कठीण होऊन जाते. त्यामुळे मथुरा चौकात चारही दिशांनी येणाऱ्या रस्त्यावर १० मीटर अगोदर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी ओहळ, सुधाकर ओहळ, संजय कोठुळे, ज्ञानेश्वर कोठुळे, मंगेश हांडोरे यांनी केली आहे. खूप दिवसांपासून प्रलंबित असलेली जनतेची ही समस्या महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर दूर करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
वाहतूक शाखा करतेय काय
विहितगाव-पाथर्डी हा रोड अवजड वाहतुकीसाठी बंद असतानाही दिवसा व रात्री मोठे डम्पर, लॉजिस्टिकची मोठी वाहने, उद्योग कंपन्यांचे मोठे ट्रक येथून भरधाव जात असतात. त्यामुळे अन्य वाहनधारक व पादचाऱ्यांना
जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच, मुंबई- आग्रा महामार्गावर जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने पाथर्डी ते नाशिकरोड-जत्रा हॉटेलमार्गे जाणारी वाहने भरधाव जातात. परिणामी अपघातांची शक्यता वाढली आहे. मात्र याप्रकारणी ज्या वाहतूक शाखेने लक्ष घालायला हवे त्यांनी सपशेल याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी वेळोवेळी निवेदन दिली आहेत.
…..
.        ..अन्यथा आंदोलन
हा चौक अतिशय धोकेदायक बनला असून ब्लॅक स्पॉट झाला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने शहरांत ज्या ठिकाणचे ब्लँक स्पॉट हटवणार आहे. त्यात विहितगांवचा मथुरा चौकाचे काम करावे. काही महिन्यांपूर्वी शाळकरी मुलाचा येथे अपघात मृत्यू झाला. साधे येथे झेब्रा क्रॉसिंगही नाही. या रस्त्याने शाळकरी मुले जात-येत असतात. तसेच गतिरोध केल्यास वाहनांचा वेग कमी होऊन अपघाताच्या घटना तरी घडणार नाही. या बाबत तीन-चार वर्षापासून मागणी करूनही याकडे  प्रशासनाने गतिरोधक बसविलेले नाहीत. म्हणून पालिका आयुक्त तसेच वाहतूक शाखेने याकडे लक्ष घालावे. व हा प्रश्न मार्गी न लावावा अन्यथा आंदोलन केल्यावशिवाय पर्याय राहणार नाही.
         माधुरी ओहोळ, (सामाजिक कार्यकर्त्या, विहितगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *