पालमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज सकाळी 9:15 वाजता पोलिस संचलन मैदान, नाशिक येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.
आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्यानिमीत्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष करून शाळा, महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाची विशेष तयारी करण्यात आली आहे. बच्चे कंपनीकडून शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यासाठी गेल्या पंधरादिवसापासून तयारी करण्यात येत होती. शाळा, महाविद्यालयासह सरकारी, निमसरकारी आस्थापनातही प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाची तयारी करण्यात आली आहे.
तसेच आस्थापन, कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमीत्त सजावट करण्यात आली असुन तिरंग्याच्या रंगाची रोषनाई करण्यात आली आहे. तर शहरातील बाजारपेठेतही प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने झेंडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.