आशा बगे   यांना यंदाचा  जनस्थान पुरस्कार जाहीर

नाशिक : प्रतिनिधी

कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणार येणारा जनस्थान पुरस्कार  कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये , मानपत्र,सन्मानचिन्ह  असे आहे. आशा बगे या कांदबरीकार असुन 2006 साली त्यांच्या भूमि या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी 1080 साली त्यांची रूक्मिणी कथा प्रसिध्द झाली.  त्यांनी  13 लघुकथासंग्रह, सात कांदबर्‍या, दोन ललित लेखांची पुस्तके लिहली आहे. तसेच भूमी आणि त्रिदल या कांदबर्‍यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. दर्पण, मारवा  हे  त्यांचे  गाजलेले  कथासंग्रह  आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ कुसुमाग्रज प्रतिष्ठानने एक वर्षाआड गोदा गौरव आणि जनस्थान हे दोन पुरस्कार दिले जातात. यावर्षी जनस्थान पुरस्काराचे 17 वे वर्ष आहे. नेहमी 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमीत्त आणि मराठी भाषा दिनानिमीत्त पुरस्काराचे वितरण करण्यात येते मात्र यंदा पुरस्काराच वितरणाची तारी्ख बदलण्यात आली असुन  पुरस्काराचे वितरण 10 मार्च 2023 रोजी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. तसेच 27 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ आणि मराठी भाषा निमीत्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत.
पुरस्कार निवड समितीमध्ये संध्या नरेपवार, अनुपमा  उजगरे, प्रफुल्ल शिलेदार, डॉ . सदानंद बोरसे , अविनाश सप्रे  आहेत.
अशी  माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी काल  शनिवार (दि.28) रोजी पत्रकार परिषदेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह मकरंद हिंगणे , विश्वस्त हेमंत टकले, विलास लोणारे ,लोकेश शेवडे,  ऍड  अजय निकम,ऍड .राजेंद्र डोकळे,प्रकाश होळकर, अरविंद ओढेकर यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *