सोलापूर : बार्शीत एक धक्कादायक घटना घडली आहे. बार्शीत शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाळू नवरदेव लग्नासाठी मुंडावळ्या बांधून मंगल कार्यालयात आले, मात्र वधूचा पत्ताच नाही. शेकडो नवरदेवांना लग्नाच्या मंडपातच मिळाला धोका. लग्न झाले नाही मात्र सगळ्यांचीच फसवणूक झाली. लग्नाच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या लग्नाळू युवकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर बनावट रॅकेटचा पर्दाफाश झाला.