नाशिक : वार्ताहर
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील लॉज व हॉटेलांमध्ये अवैध तरुण-तरुणीची गैरकृत्ये सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस अधीक्षकांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लाँच व हाँटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत. याठिकाणी दिवसेंदिवस लाँजेच्या संख्येमध्ये वाढ होत आहे.
स्थानिकांकडून कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी स्थानिक करीत आहेत.
जिल्ह्यातील हॉटेल, लॉजमध्ये कोणतेही गैरव्यवहार, गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाहीत. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील व्यावसायिकांना गैरकृत्य, व्यवहार आढळल्यास कारवाई करण्याचे स्थानिक पोलिसांना आदेश अधिक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत. त्र्यंबकेश्वर
रस्त्यावर महत्त्वाची धार्मिक स्थळे असून, हजारो भाविक या रस्त्यावरून येत असतात. येथील लॉजमध्ये गैरकृत्ये सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक लॉजमध्ये महाविद्यालयांच्या विद्यार्थीचा वावर दिसतो. यामुळे पोलिस काय कारवाई करतात या कडे बघावे लागणार आहे