नाशिक : प्रतिनिधी
भूमि अभिलेखचे अधीक्षक महेशकुमार शिंदे आणि लिपिक अमोल महाजन यांना लाच घेतल्याने रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 दिवसांची म्हणजेच 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शिंदे आणि महाजन या दोघांना पन्नास हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी काल रंगेहाथ अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तक्रारदाराच्या 12 क्रमांकाच्या भूमिअभिलेख उतार्यातील नाव चुकले होते, ते दुरुस्त करण्यासाठी शिंदे या अतिरिक्त उपसंचालकाने तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागितली होती, तडजोडी अंती50 हजार देण्याचे ठरले, याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती,पथकाने लावलेल्या सापळ्यात दोघेही अडकले, ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.