पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचे निधन
कराची: पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचे आज सकाळी निधन झाले, ते79 वर्षाचे होते, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दुबई येथे उपचार सुरू होते, पाकिस्तान मीडिया च्या हवाल्याने हे वृत्त प्रसारित झाले आहे, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते,, त्यांना अमायलोडेसिस नावाचा आजार झाला होता, त्यांचे सर्व अवयव निकामी झाले होते,
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ते लष्करात कनिष्ठ अधिकारी म्हणून सामील झाले होते, 1965 च्या युद्धत ते भारताविरुद्ध लढले होते, 1971 च्या युद्धात देखील मुशर्रफ यांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे त्यांना सरकारने अनेकवेळा बढती दिली, 1998 मध्ये ते लष्करप्रमुख झाले, 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बनवले, पण एक वर्षांनतर 1999 मध्ये मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांना पदच्युत केले, आणि मुशर्रफ हुकूमशहा बनले, त्यानंतर नवाझ शरीफ यांनी कुटुंबासह पाकिस्तान सोडले, परवेझ मुशर्रफ यांचे कुटुंब फाळणीपूर्वी भारतात खूप समृद्ध होते, बलुचिस्तान मधील लोकांचा मुशर्रफ यांनी खूप छळ केला,