बजेटमध्ये भुसावळ विभागासाठी 1470 कोटींची तरतूद
नाशिकरोड : प्रतिनिधी
भारताचा बुधवारी अर्थसंकल्प मांडण्यात आला. दरम्यान यंदाच्या बजेटमध्ये भुसावळ रेल्वे विभागासाठी 1470.94 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती रेल्वेने पत्रकाव्दारे दिली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध कामाचा कामांचा समावेश असून त्याद्वारे ती केली जाणार आहें आहे.
या अर्थसंकल्पात चालू असलेल्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी एकूण 523.20 कोटीची तरतूद आहे. ती पुढीलप्रमाणे- इंदूर-मनमाड- 368 किमी- 2 कोटी, धुळे-नरडाणा- 50 किमी-100 कोटी, पाचोरा-जामनेर- मलकापूर- 84 किमी- 50.20 कोटी, भुसावळ-जळगाव तिसरा मार्ग- 1 कोटी, मनमाड-जळगाव तिसरा मार्ग,160 किमी- 350 कोटी, जळगाव- भुसावळ चौथा मार्ग- 25 किमी- 20 कोटी.दुहेरी मार्ग नवीन/चालू कामासाठी 370 कोटीची तरतूद पुढीलप्रमाणे- मनमाड-जळगाव तिसरा मार्ग- 160 किमी- 350 कोटी, जळगाव- भुसावळ चौथा मार्ग – 20 कोटी. विद्यमान रेल्वे स्थानक/यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी 15.25 कोटीची तरतूद आहे. नवीन रस्ता उड्डाणपुल/पुलाखालचा रस्ता कामासाठी 43.63 कोटीची तरतूद असून ती पुढीलप्रमाणे- जळगाव- गेट क्र. 147 उड्डाणपूल-10.12 कोटी, बडनेरा गेट क्र. 7 फ्लायओव्हर-3 कोटी, नांदुरा गेट क्र. 20 उड्डाणपूल- 1 लाख, खंडवा गेट क्र. 162 उड्डाणपूल- 1 कोटी, देवळाली गेट क्र. 90 उड्डाणपूल 6.68 कोटी. चांदूरबाजार गेट क्र. 70 उड्डाणपूल- 4.06 कोटी, कजगाव गेट क्र. 126 उड्डाणपूल- 50 लाख, रावेर खाल्ले क्र. 171 उड्डाणपूल- 8.67 कोटी, निंभोरा गेट क्र. 169 उड्डाणपूल- 3 कोटी, भादली गेट क्र. 149 उड्डाणपूल- 95 लाख,अमरावती गेट क्र. S-1 उड्डाणपूल- 2.78 कोटी, अमरावती गेट क्र. S-3 उड्डाणपूल- 2.77 कोटी.
विद्यमान ट्रॅक देखभाल/नूतनीकरणासाठी 255 कोटीची, विद्यमान सिग्नलिंग आणि दूरसंचार देखभालीसाठी 12.58 कोटी तर बडनेरा- नवीन वॅगन कार्यशाळा बांधकामासाठी 40.11 कोटींची तर नाशिकच्या एकलहरेतील नवीन रेल्वे चाक कार्यशाळेच्या बांधकामासाठी 10 कोटींची तरतूद आहे. नवीन लिफ्ट आणि एस्केलेटर, फूट ओव्हर ब्रिज, सॉफ्ट अपग्रेडेशन आणि रेल्वेस्थानक पुनर्विकासासाठी 186 कोटींची आणि इतर विविध कामां ७ कोटींची तरतूद आहे. तसेच
नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी 8.17 कोटीची तरतूद आहे. ती अशी- इगतपुरी-भुसावळ तिसरा मार्ग 308 किमी सर्वेक्षण-15 लाख, भूसावळ-खंडवा 3री/4थी मार्ग 123 किमी सर्वेक्षण-15 लाख, औरंगाबाद-भुसावळ मार्ग 160 किमी सर्वेक्षण-15 लाख, औरंगाबाद-बुलढाणा-खामगाव मार्ग 170 किमी सर्वेक्षण-25 लाख, भुसावळ-बडनेरा-वर्धा चौथा मार्ग अंतिम स्थानसर्वेक्षण 313 किमी- 5.26 कोटी, भुसावळ-खंडवा नवीन 3री/4था मार्ग अंतिम स्थान सर्वेक्षण- 1 कोटी,
मनमाड- जळगाव चौथा मार्ग अंतिम लोकेशन सर्व्हे- 1 कोटी.