एकाचा मृत्यू; एक गंभीर
नाशिक रोड: प्रतिनिधी
सातपुरच्या अशोकनगर मध्ये सावकारांमुळे पित्यासह दोघा मुलांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नाशिकरोड मध्ये सावकारांमुळे दोघा भावानी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला’ यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहेत’ मृत्यू झाल्यानंतर रुग्णालया बाहेर नातेवाईकानी रास्ता रोकोचा प्रयत्न केला, रवींद्र कांबळे आणि जगनाथ कांबळे हे दोन्ही भाऊ एका सावकाराकडे पैसे वसुलीचे काम करतात, दोन्ही भावांचे या खाजगी सावकाराबरोबर वाद झाले, यातून दोन्ही भावानी विष प्राशन केले, यात रवींद्र चा मृत्यू झाला, यानंतर नातेवाईकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते,