पोस्टात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिकरोड मधील पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून यवतमाळ येथे राहणाऱ्या एका बेरोजगारास तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा ढक्कदायक प्रकार समोर आला आहें. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ येथे राहणारे शरद दत्तात्रय आडे यांनी यासंदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांचा मुलगा पृथ्वीन यास नाशिकरोड पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी लावून देतो असे सांगून परिसरात राहणारे विनोद शेळके देवानंद गायकवाड तसेच रोडे व घोष पूर्ण नाव माहित नाही यांनी शरद आडे यांना यवतमाळ येथून आणले व त्याला तर नाशिकरोड परिसरात वरील चौघांनी आडे यांना त्यांच्या मुलाच्या नावाची ऑर्डर बनावट नोकरीची देऊन फसवणूक केली दरम्यान आडे यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन गाठले व या संदर्भात तक्रार दाखल केली दरम्यान या घटने प्रकरणे पोलिसांनी वरील चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नाय दे उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करत आहे.