घंटागाडीचालक स्वतःच बनले स्वच्छतादूत
नाशिक: प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीतील कचऱ्याचे आगार बनलेल्या ब्लॅकस्पॉटचे ग्रीन स्पॉटमध्ये रूपांतरित करण्याचा विडा घंटागाडी कर्मचारी आणि वॉटरग्रेसचे व्यवस्थापक विजय जमदाडे यांनी उचलून तो संकल्प सिद्धीस नेल्याबद्दल या सर्वांचे उद्योजकांबरोबरच सर्वच थरातून स्वागत होत आहे.
घंटागाडीवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी 10 झाडे दत्तक घेतले.आधी वेअरहाऊससमोरील ब्लॅकस्पॉटची साफसफाई करून हा परिसर चकाचक केला.नंतर दत्तक घेतलेली झाडे तेथे लावली आणि ती मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.आम्ही कचरा उचलण्याचे कार्य करीत असलो तरी आम्हालासुद्धा सर्व परिसर स्वच्छ,सुंदर आणि हरित असावा असे वाटते आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे,असे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सांगितले तेव्हा सर्वाना अक्षरशः गहिवरून आहे.
आयमाने घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.स्वच्छतेबसद्द्ल कळकळ असलेल्या आणि इतरांपुढे आदर्श घालून देणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना खरोखरच सलाम.त्यांचा हा आदर्श इतरांनी घेतल्यास स्वच्छतेच्याबाबतीत नाशिक निश्चितच अव्वल स्थान पटकावेल असा विश्वास आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी व्यक्त केला.आयमातर्फे त्यांचा यथोचित गौरव केला जाईल,असेही ते पुढे म्हणाले.