जिल्ह्यात आजपासून जागरुक
पालक, सुदृढ बालक अभियाननाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात आज (दि.9) पासून जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानाला प्रारंभ होत असून, या त0 ते 18 वयोगटातील बालके तसेच किशोरवयीन मुला मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण, आदिवासी व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेतंर्गत 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या बालकांची, किशोरवयीन मुला-मुलीची प्राथमिक आरोग्य तपासणी, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे आदी राबविण्यात येणार आहे. या अभियानात एकूण 76 पथके आणि नियमित सहा पथके मिळून विद्यार्थ्यांची तपासणी करणार आहेत.
जिल्ह्यात महाआरोग्य अभियान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात महाआरोग्य अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी रुग्णालयांत हे अभियान होणार आहे.
महारक्तदान शिबिर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्त संकलनाचे उद्ीष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात हे महारक्तदान शिबिर तालुकापातळीवरील सरकारी रुग्णालयात होणार आहे.