नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका वर्ग ‘ब’ मध्ये असल्याने कामाचा वाढता व्याप बघता दोन अतिरिक्त आयुक्त देण्यात आले आहेत. त्यापैकी महिन्यांपुर्वी एका अतिरिक्त आयुक्तांची बदली झाली. त्याजागी नवीन अतिरिक्त आयुक्तांनी पदभार स्विकारला. पण, त्यानंतर त्यांनी दालनाकडे पाठ फिरवली.मात्र यामुळे विविध कामे खोळंबल्याचे चित्र आहें त्यामुळे अतिरिक्त आयुक्त येईनात अन फाईली पुढे सरकाणा असे काहीसे चित्र आहें.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांच्या गैरहजेरीने अनेक विभागांचे कामकाज खोळंबले असून त्यांच्या टेबलावर फाईल्स धुळखात पडल्याने निर्णय प्रक्रियेत दिरंगाई होत आहे. त्यामुळे अनेक विभागांच्या अधिकार्यांना अतिरिक्त आयुक्तांच्या कॅबिनला बाय देऊन आता थेट आयुक्तांकडे धाव घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.अतिरिक्त आयुक्त कधी कामकाजाला सुरुवात करतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्तांच्या सततच्या गैरहजेरीमुळे घनकचरा संकलन, मलेरीया, आरोग्य, अग्निशमन या शहराच्या आरोग्याशी निगडीत महत्वपूर्ण विभागाची जबाबदारी आहे. या सहा विभागांचे काम सध्याच्या घडीला खोळंबले आहे. कोणताही निर्णय होत नसल्याने फाईलींचा प्रवास थांबला आहे. कामकाज खोंळबल्याने सबंधित विभागातील कामकाजावर त्याचा परिणाम पहायला मिळत आहे. त्यामुळे आता सबंधित विभाग आयुक्तांकडे दाद मागणार का याकडे लक्ष लागले आहे. या विभागाच्या सर्व फायली अतिरिक्त आयुक्तांच्या टिपणी व स्वाक्षरीनंतर पुढे जातात. या फाईलिंवर कार्यवाहीच होत नसल्याने या फाईलीना मुहूर्त कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय