भेट तुझी माझी स्मरते…जब अन्तसमय आया तो
डॉ किर्ती वर्मा
जब अन्तसमय आया तो
केह गये के अब मरते हैं
खुश रेहना देश के प्यारों.
खुश रेहना देश के प्यारों
अब हम तो सफ़र करते हैं
अब हम तो सफ़र करते हैं
लहानपणापासुन ये मेरे वतन के लोगो या गाण्यातील हे कडवे ऐकले की डोळ्याच्या कडा ओल्या व्हायच्या, अगदी पंडित नेहरूंनी ज्यांचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे. अश्या भारताच्या स्वर कोकिळा लता मंगेशकर यांना एकदा तरी भेटावे असे मना पासून वाटत होते. त्यांच्या त्या दोन वेण्या आणि साधी राहणी मनात घर करून होती. माझी आणि त्यांची भेट कशी होईल या विषयी मी नेहमी विचार करायची!!!
लग जा गले, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही, रंगिला रे……. अजीब दास्ता है यह, तू जहा जहा चलेगा,… सत्यम शिवम सुन्दरम, मौसम है आज सुहाना…. बापरे एवढे एक से बढ़कर एक गाने लता दीदी ने गायले आहेत की नेमका आपल्या आवडीचा कोणता? अवघड आहे सांगणे….
असो त्यांच्या भेटीचे हे स्वप्न खरे ठरले 1998 ची गोष्ट आहे. मुंबई प्रवासा दरम्यान – मी माझ्या क्लास च्या ट्रेनिंग साठी 3 दिवसासाठी मुंबई ला गेली होती. दिवस भर आमची ट्रेनिंग असायची आणि संध्याकाळी थोडी भटकंती! या ट्रेनिंग साठी औरंगाबाद वरुन आलेली माझी मैत्रिण सविता सोबत होती.
दुसर्या दिवशी ट्रेनिंग झाल्यावर आम्ही आमच्या हॉटेल च्या रूम वर आलो, तिथे आल्यावर फ्रेश होवून खरेदीला आम्हाला जायचे होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. आम्ही दोघी तयार होवून निघालो खरेदी साठी!
ध्यानीमनी काहीच नव्हते, फक्त कोणासाठी काय घ्यायचे हा विचार आम्ही करत होतो. झहेशपळु झरश्रश्ररवर्ळीा ारश्रश्र मध्ये आम्ही दोघींनी एंट्री केली. आपले बजेट आणि आवडी अशी तारांबळ आमची चाललेली, तेच आम्हाला मॉल मध्ये काम करणार्या एका कर्मचार्या कडून कळले की थोड्या वेळाने त्या मॉल मधील एका प्रसिद्ध ज्वेलर्स च्या दुकानात एक बड़ी हस्ती येणार आहे आणि त्या आहेत आपल्या दीदी होय लता दीदी बापरे….. लता दीदी येणार आहेत त्या ही अर्ध्या तासात पण फक्त 10 मिनिटात साठी…. ते काही का असेना पण दुरून का होईना आम्ही त्यांचे दर्शन घ्यायचे ठरवले. आपल्या भेटचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार! आनंद, उत्सुकता, आणि काय सांगू मनाची नुसती घालमेल चाललेली… आमची खरेदी राहिली बाजूला आणि आम्ही एका कॉफी सेंटर मध्ये दीदींची वाट बघत बसलो.
आणि तो क्षण आला…. अगदी मोती कलर ची सिल्क साडी, नेहमीची केश रचना, आणि हलकासा मोत्याचा सेट…. अहाहा काय सांगू…. धर्तीवर ज़र सरस्वती अवतरली तर… तर ती अशीच असेल.. स्वर सम्राज्ञी लता दीदी, त्या सौंदर्याला, त्या तेजोमय मूर्तीला योगा योगाने खूप जवळून पाहण्याचा योग आला… ही खर तर माझ्या आयुष्यातील ग्रेट भेट होती. होय ग्रेट भेट!
दीदी आल्या, आम्ही दुरून का होईना त्यांना पाहिले, आता निघावे आपण असा हट्ट माझी मैत्रिण करू लागले, पण माझे पाय तिथून निघेना, मन ऐकेना, म्हणून मी तिला विनंती केली की थांब थोडे कदाचित एखादा स्वर आपल्या कानावर पडला तर!
पण ती म्हटली की हे कसे शक्य आहे, त्या 10 मिनिटात लगेच जाणार आहेत, पण दीदी तिथे येण्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती म्हणून जास्त गर्दीही नव्हती म्हणून माझे मन म्हणत होते की त्यांना जवळून बघण्याची संधी मिळेल. माझ्या आग्रहाखातर माझी मैत्रिण थांबली. जवळ पास 15 – 16 मिनिटांनी दीदी त्या दुकानातून बाहेर पडल्या छोटेखानी उदघाटन सोहळा संपन्न झाला होता. आम्ही अजूनही कॉपी शॉप च्या बाहेर घुटमळत होतो. दीदी सरळ निघाल्या आणि हे काय अचानक – – अचानक त्या कॉपी शॉप च्या दिशेने निघाल्या….. अगदी आमच्या दिशेने हे काय चाललेय रेशमी वस्त्र परिधान केलेली सुंदर, शांत चेहरा असणारी आपली दीदी होय आपली दीदी अगदी आमच्या दिशेने येत होती. =ऽबापरे डोळ्यांची पापणी सुध्दा बंद होवू नये माझ्या! असे वाटत होते, ते क्षण डोळ्यात, मनात मला घट्ट कोरून ठेवायचे होते.
अचानक कोण कुठून मला स्वाक्षरी चे आठवले, माझ्या कडे लिखाणाची सवय असल्याने नेहमी पर्स मध्ये डायरी व पेन असतोच मी पटकन हे साहित्य बाहेर काढले शक्यता नव्हतीच मुळी! पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून त्या जवळ येताच मी डायरी घेवून पुढे सरसावली आणि फक्त एवढेच म्हटले
दीदी आणि काय सांगू त्या चेहर्यावर उमटलेले स्मित हास्य घेवून त्यांनी लगेच माझ्या डायरी वर सही तर केलीच पण लिहिले सुध्दा ुळींह र्श्रेींश मी फक्त बघत होती खजिना हाती आल्यागत…. तुमचे ते.. ते गाणे आहे न ये मेरे वतन के लोगो…. ते माझे खुप आवडते आहे दीदी…. पाणी येते डोळ्यात प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात….. तैसे सगळेच गाणे खूप आवडतात मला, काय सांगू.. अहो भाग्य आज तुम्ही मला भेटल्या … त्या हसल्या, माझ्या खांद्या वर हळूच थोपटले आणि हळूच पुढे निघाल्या मी फक्त
हात जोडून उभी……… अग चल आता गेल्या त्या सविता ने मला हलवले आणि मी भानावर आली.
अग काय हे झोपेत किती बडबड करत आहे, उठ आता असे शब्द जेव्हा अहोंचे कानावर आले. तेव्हा मी दचकून झोपेतून जागी झाली. अहो माझी डायरी कुठे ठेवली तुम्ही?
लतादीदींनी सही केली त्याच्यावर, ऑटोग्राफ आहे त्यांचा, काय सुन्दर दिसते हो ही सरस्वती! -मी
स्वप्न वगैरे पाहिले की काय सकाळी सकाळी – अहो
स्वप्न अरे तर आपण स्वप्नात दीदींना भेटलो. हे समजल्यावर मी रडू लागली…. घडलेली हकीकत व स्वप्न जेव्हा यांना कळाले तेव्हा त्यांनी मला धीर दिला म्हटले, की काही व्यक्ति अश्या असतात न किर्ती की त्यांचे आणि आपले काहीच नाते नसते, पण आपण त्यांना भेटू इच्छितो , त्यांना स्मृती मध्ये ठेवतो, पण त्यांना भेटू शकत नाही कारण त्यांच्या कार्याची उंची खूप मोठी असते, आणि तसेही दीदी अश्या बाहेर हल्ली जात ही नाही, कारण त्यांचे आरोग्य, तू प्रार्थना कर की त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून’.
हे ऐकून मी ही उठली, कामाला लागली, माझ्या मनात असलेली ही काल्पनिक भेट जरी असली तरी दीदींचा आवाज मी कुठूनही ऐकू शकते त्यांच्या गाण्यांच्या माध्यामातून हे भाग्य काय थोडे आहे? या भारत रत्न लतादीदी आज आपल्या सोबत नाही पण त्यांची ही संगीत सेवा आपला देश, या देशातील माझ्या सारखे त्यांचे फॅन कधीच विसरणार नाही.
माझ्या स्मरणातील ही भेट काल्पनिक जरी असली तरी अजरामर गीतांमधून दीदी रोज भेटतात.