मखमलाबाद मधील कोळीवाडा नजिक ड्रेनेज पाणी रस्त्यावर : शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पंचवटी : वार्ताहर
प्रभाग ६ मधील मखमलाबाद गावातील कोळीवाडा परिसरातील ड्रेनेज मधील पाणी पूर्णपणे रस्त्यावर वाहत असून शाळेत जाण्याऱ्या विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून कोळीवाडा परिसरातील ड्रेनेज मधील पाणी रस्त्यावर वाहत आहे . शाळेकडे जाणारा रस्ताही या पाण्याखाली गेला आहे . त्यामुळे दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे . तर याच ठिकाणी शाळा व महाविद्यालय , मनपा शाळा असल्याने विद्यार्थ्यांना याच दुर्गंधीयुक्त पाण्यातून शाळेत जावे लागत आहे . येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील दुर्गंधीचा सामना करावा लागत असून नाशिक महानगर पालिकेच्या संबधित विभागाने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे