तब्बल 61 फुटाचा शिवपुतळा ठरतोय आकर्षण

तीन हजार किलो वजन; विश्‍वविक्रमी नोंद

नाशिक : प्रतिनिधी
शिवजयंतीनिमित्त शहरातील अशोकस्तंभ या परिसरात 61 फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा नाशिककरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.पुतळ्याची उभारणी  अशोकस्तंभ मित्र मंडळाकडून करण्यात आली आहे.या पुतळ्याची रूंदी 22 फुट तर वजन तब्बल 3 हजार किलो आहे.  हा पुतळा बनवण्यासाठी 12 दिवसांचा कालावधी लागला आहे. अशोकस्तंभ येथे पुतळा 3 मोठ्या क्रेनच्या मदतीने दोन भागात हा पुतळा उभारण्यात आला.
दीड महिन्यांपूर्वी पुतळा बनवण्यास त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील एच.पी.ब्रदर्स आर्टसच्या हितेश आणि हेमंत पाटोळे यांनी सुरूवात केली होती. मात्र दुर्देवाने पुतळ्याचे थोडेच रंगकाम बाकी असताना शॉर्टसर्किंटमुळे लागलेल्या आगीत पुतळ्याची हानी झाली. त्यानंतर बारा दिवसात पुन्हा नवीन पुतळा बनवण्यात आला.

शिवप्रेमींची सेल्फीसाठी गर्दी
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा नाशिककरासाठी आकर्षण ठरत आहे. त्यामुळे पुतळा उभारल्यापासून फोटो सेशनसाठी शिवप्रेमी नाशिककरांची गर्दी होत आहे.

 

वंडर बुकमध्ये विश्‍वविक्रमी नोंद
अशोकस्तंभ मित्रमंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा म्हणून विश्‍वविक्रमाची नोंद व्हावी याकरिता वंडरबुक ऑफ रेकॉर्डकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वंडर बुकच्या टीमने भेट देऊन पाहणी करून निरीक्षणे नोंदवून मोजमाप घेऊन त्याची विश्‍वविक्रमात नोंद केली असल्याची माहिती वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी एमी छेडा यांनी दिली.

उद्या अर्पण होणार कवड्यांची माळ
शिवजयंतीनिमित्त छत्रपती सेनेकडून 21 फूट लांबीची कवड्याची माळ आज पुतळ्यास अर्पण केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *