पक्षाचे नाव चिन्ह मिळाल्याने जल्लोष
नाशिक : प्रतिनिधी
शिंदे गटाला निवडणूक चिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्याने पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिरात शनिवारी (दि.18) महाआरती करण्यात आली. शुक्रवारी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिल्याने शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करुन काळाराम मंदिरात महाआरती घेत पेढे वाटले.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सह संपर्क प्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रविण तिदमे आदीसह शिंदे गटाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षांवर निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालाने संपूर्ण राज्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष केल्याचं पाहायला मिळत असून नाशिकमध्येनिकालानंतर जल्लोष साजरा केला जातो आहे. शनिवरी सकाळी काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाव आणि चिन्ह मिळाल्याच्या उत्साहात परिसरात पेढ्यांचे वाटप केले. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला आणि आयोगाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला