गरजूंच्या मदतीसाठी धावले हजारो नाशिककर

नाशिक : प्रतिनिधी
समाजातील गरजू व वंचित घटकांच्या मदतीसाठी हजारो नाशिककर काल नाशिक रनमध्ये सकाळच्या थंडीतही धावले. नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 21 वी रन पार पडली.

नाशिकच्या क्रीडापटूंच्या हस्ते नाशिक रनच्या ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नाशिक  रनला हिरवा झेंडा दाखवून रनचा प्रारंभ करण्यात आला.  विशेष मुले, सामान्य मुले यांची रन झाल्यानंतर प्रौढांची रन पार पडली. यावेळी नवीन तोलानी डान्स इन्स्टिट्यूटतर्फे  विशेष नृत्य सादरीकरण करण्यात आले. सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या कुपनातून लकी ड्रॉ काढण्यात आला. नाशिक रनचे सचिव अनिल दैठणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
छोट्या मुलांसाठी नाशिक रनचा शुभारंभ महात्मानगर क्रीडांगणापासून रिलायन्स फ्रेश,पारिजात नगर,वर्ल्ड ऑफ टायटन, मधु  इण्डस्त्रीस, परात समर्थ नगर,पारिजात नगर,सिक्स सिग्मा हॉस्पिटल व महात्मा नगर,त्याच प्रमाणे प्रौढासाठी महात्मा नगर,रिलायन्स फ्रेश,पारिजात नगर, वर्ल्ड ऑफ टायटन,रॉकेट सर्कल, जेहान सर्कल, स्वामी समर्थ सर्कल  परत रॉकेट सर्कल,समर्थ नगर,पारिजात नगर,सिक्स सिग्मा हॉस्पिटल महात्मानगर बंजारा हॉटेल व परत महात्मा नगर क्रीडांगण  असा रन चा मार्ग  होता. या वेळी लकी ड्रा मध्ये गेटवे हॉटेल तर्फे 19200 रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस सहा भोजनाचे कूपन व 12800 रुपयाचे  द्वितीय बक्षीस चार भोजनाचे कूपन तर अभय स्टील तर्फे10000 रुपये किमतीचे  तृतीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून फर्निचर गिफ्ट कूपन,आयबीस हॉटेल तर्फे 8500 रुपयाचे हॉटेल स्टे चे चतुर्थ बक्षीस देण्यात आले , पाचव्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून नवीन डान्स अकाडमीतर्फे 7500 रुपये किमतीचे डान्स व फिटनेस साठी तीन महिने मेंबर शिप चे कूपन ,सहाव्या नंबर चे आयबीस हॉटेलचे 7000 रुपयाचे स्टे व मिल कूपन एस बी सर्व्हिसेसच्या वतीने सात हजार रुपयाचे सातव्या क्रमांकाचे सायकली साठी चे कूपन, आठव्या क्रमांकाचे मेहेर हब मुल्टी कुशिन्स तर्फे 5000 रुपयाचे भोजन कूपन, नवव्या क्रमांकाचे रेडीसान ब्ल्यू तर्फे 3200 रुपयाचे भोजन कूपन ,दहाव्या क्रमांकाचे रदिसन ब्ल्यू तर्फे 3200 रुपयाचे भोजन कूपन अश्या प्रकारे लकी ड्रॉ कूपन वितरित करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती अशिमा मित्तल,  नाशिक रनचे अध्यक्ष एच एस बॅनर्जी,  उपाध्यक्ष आर आर भुयांन , सचिव अनिल दैठणकर खजिनदार राजाराम कासार, विश्वस्त ए अनंथरामन, प्रबल रे, मुकुंद भट, अशोक पाटील,श्रीकांत चव्हाण, नाशिक रनचे माजी विश्वस्त सुधीर येवलेकर, उत्तम राठोड, रमेश जी आर, बॉश लिमिटेडच्या वरिष्ठ उपाध्यक्ष करीन गीलगिस, टीडीकेचे अविनाश देशपांडे, कलोल सहा, गगन बन्सल, नाशिक रनचे स्वयंसेवक स्नेहा ओक, नितीन देशमुख, राजू माने, गोविंद बोरसे,सन फ्लॅग फाउंडेशनचे डेप्युटी मार्केटिंग हेड सचिन शिलोथे, वासुदेव भगत, ,बजाज सनचे व्यवस्थापकीय संचालक  सुमित बजाज, स्मार्ट सोल्यूशनचे शहा, फॉक्स सोल्युशन्सचे संचालक शशांक बेथारिया ,सीइइपी इंडियाचे संचालक डी के राय,  सीइइपी इंडिया चे मार्केटिंग हेड सूची चार्तर्जी , वी आय पी इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष आशिष शहा, अर्जस स्टीलचे वरिष्ठ महाव्यवस्थापक टी बी चौधरी, आकाश कसोदकर , एबीबी चे उप बिझिनेस हेड , मनुष्यबळ महाव्यवस्थापक दयानंद कुलकर्णी,एपिरोक चे महाव्यवस्थापक अरविंद पाटील, मनुष्यबळ महाव्यवस्थापक पल्लवी पांडे, नीलराज कंपनी चे संचालक राहुल संघवी, रणजित कोपिकर पाहुण्यांनी या रन मध्ये विशेष उपस्थिती लावली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी   सागर काजळे, उमेश ताजनपुरे, सचिन जाधव, निखिल जाधव, धैर्यशील पाटील,श्रीपाद कुलकर्णी, संतोष जोशी, प्रमोद हिरे, डॉ विनिता जॉर्ज, व सचिन गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *