सिडको पुन्हा हादरले, संशयातून उचलले टोकाचे पाऊल
सिडको:
संशयातून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुंचाळे शिवारात पतीने पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा भुजंग तायडे (वय २५) असे मयत पत्नीचे नाव आहे. या महिलेची हत्या करून पती भुजंग अश्रू तायडे (वय ३५) याने आत्महत्या केली. मंगळवारी गंगापूर पोलिसांच्या हद्दीत मद्यपी पतीने पत्नीची हत्या केली होती. या घटनेनंतर चुंचाळे शिवारात पत्नीचा खून व पतीची आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. अंबड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.