मनात येणारे चांगले विचारच आत्मसात करा

सुधांशू महाराज : विश्‍व जागृती मिशनतर्फे सत्संग

नाशिक: प्रतिनिधी
मानवाने जीवनात सदगुण संपादन करावे, सत्व वर्तन करावे मनात जे चांगले विचार येतात, त्याचाच विचार करावा वाईट विचार सोडून द्यावे, असे विचार विश्‍व जागृती मिशनचे सदगुरु सुधांशू महाराज यांनी व्यक्त केले.
विश्व जागृती मिशनचे परमपूज्य  सुधांशू महाराज यांच्या सत्संगास काल सांयकाळी धार्मिक वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. त्यापूर्वी सिटी सेंटर मॉल परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भाविक महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुधांशू महाराज यांच्या मुख्य आश्रम दिल्ली येथे असून विश्व जागृती या नावाने ट्रस्ट प्रस्थापन केला असून आज भारतभर विदेशात 48 शाखा आहेत 28 आश्रम असून महाराजांच्या आतापर्यंत 7 हजारांच्या वर प्रवचन झाले आहेत.
नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनी जवळ आठ एकर जागेत नियोजित गौरीशंकर धाम या आश्रमाचे काम सुरू असून आश्रमाच्या निर्माण हेतूने सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको, सातपूर, गंगापूररोड, त्र्यंबकरोड परिसरातील भाविकांनी या सत्संगासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे  आमदार हिरामण खोसकर  तसेच विश्व जागृती मिशन नाशिक मंडळाचे ओंकारसिंग राजपूत, अजित नागरे, एम.एम. सोनवणे भालचंद्र राणे, रमेश थोरात, विजय ठाकूर, मंगला आहेर, आरती समिती प्रमुख जयमाला बंग, मंगला कुलकर्णी, योगिता उदावंत, मंगला थोरात, सोनाली शहा, संगीता केडिया, मोहिनी चव्हाण, वर्षा वैद्य, कमल वर्मा, सुनीता नागरे, मीनाताई घोडके, विवेक वैद्य, मालवीय, भन्साळी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *