ईपीएफच्या निधी आपके निकट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ईपीएफच्या निधी आपके निकट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक-भविष्य निधी कार्यालयातर्फे निधी आपके निकट हा कार्यक्रम आयमाच्या सभागृहात साजरा झाला.
व्यासपीठावर आयमा अध्यक्ष निखिल पांचाल,सरचिटणीस ललित बूब,डी डी गोपाळे (बीओटी चेअरमन),कमिटी चेअरमन के एन पाटील,इपीएफओचे आयुक्त अनिल कुमार प्रीतम,जे बी खैरनार(सहाय्यक संचालक इएसआयसी),निपमचे अध्यक्ष प्रकाश बारी आदी होते.
अनिलकुमार प्रीतम यांनी यावेळी भविष्य निर्वाह निधी व ऑनलाईन कामकाजाची माहिती दिली.इपीएस 95 च्या सेवानिवृत्तीधारकांच्या पेन्शनवाढीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे त्यांनी विश्लेषण करून सांगितले.यावेळी ऑनलाईन अर्ज भरतांना येणाऱ्या असचणींबाबत विचारलेल्या विविध शंका-कुशंकाचे प्रीतम यांनी योग्यपणे निरसन केले.याबाबत आणखी काही नवीन आदेश किंवा परिपत्रक आल्यास त्याबाबत प्रेसनोट काढून तातडीने त्याची माहिती दिली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सुविधा समागम कार्यक्रम
याबरोबरच ईएसआयसीचा सुविधा समागम हा कार्यक्रम पार पडला.उपसंचालक निश्चयकुमार नाग,
साहाय्यक संचालक जितेंद्र खैरनार,शाखा व्यवस्थापक मंगेश गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना कामगार विमा योजनेबद्दल मार्गदर्शन केले.नंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम पार पडला. मंगेश महाजन,स्वप्नील कऱ्हाडे आदीही यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *