वणी : प्रतिनिधी
वणी- सापुतारा मार्गावर चौसाळे फाट्यानजीक भरधाव व्हर्ना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली उतरुन झालेल्या भीषण अपघातात दोन युवती व एक युवक जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या याबाबत वणी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी : काल दुपारी साडेचारच्या सुमारास वणी- सापुतारा मार्गावर चौसाळे फाट्यानजीक व्हर्ना कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ही कार रस्त्याच्या खाली जाऊन अपघात झाला. या अपघातात अंजली राकेश सिंग (23 वर्षे रा. सातपूर, नाशिक) नोमान चौधरी (21, रा. सातपूर अंबड लिंक रोड नाशिक) व सृष्टी नरेश भगत (22 वर्षे रा. रामबाज स्क्वेअर, नागपूर) हे तिघे ठार झाले. तर अजय गौतम (20 वर्षे रा. सातपूर लिंक रोड नाशिक हा जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत वणी पोलिसात सुरू होते.