धुळवड पारंपरिक उत्साहात साजरी
नाशिक ः प्रतिनिधी
धुळवड पारंपारिक उत्साहात साजरी करण्यात आली.धुळवड आणि वीरांच्या मिरवणूकीने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांचा उत्साह धुळवडीला वाढला होता.
होलीच्या दुसर्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते उत्तर भारतीयंामध्ये धुळवडीला रंगपंचमी साजरी करतात.
शहर आणि उपनगरांमध्ये होळीभोवती देवाचे प्रतिक म्हणून लहान मुलांना वीराची वेशभूषा करून नाचविण्यात आले.तर शहरात प्रथेप्रमाणे जुने नाशिक ते रामकुंडापर्यंत वीरांची मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीला प्राचीन परंपरा असल्याने दाजीबा वीर मिरवणूकीचा उत्साह शिगेला पोहचला होता.याप्रसंगी दाजिबा विरांचा विशेष मान आहे.
शहरातील मेनरोड,सराङ्ग बाजार, तीवंधा चौक,पाटील गल्लीसह गोदाघाट आदी परिसरातून ढोल वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
धुलिवंदन अर्थात धुळवडीला वीर नाचविण्यात आले.पाटील गल्ली येथून विरांच्या मिरवणूकीला दुपारी चार वाजता सुरूवात झाली.सायंकाळी विरांच्या टाकाची विधीवत पूजा करण्यात आली.टाक खोबर्याच्या वाटीत घेवून मिरविण्यात आले. होळीला प्रदक्षिणा मारून पुढे मिरवणूक मार्गस्थ करण्यात आली.शहरातून मिरविल्यानंतर टाकांचे रामकुंडावर स्नान घालून विधिवत पूजन करण्यात आले.
त्यानंतर घरी नैवेद्य दाखविण्यात आला.या दिवशी होळीच्या निखार्चांवर पाणी तापवून त्याने घरातील सर्वांनी अंघोळ करण्यास आगामी उन्हाळा सुसह्य होतो.उष्म्याचे विकार होत नाही अशी धारणा असल्याने लहानथोर स्नान करतात.कोरोनामुळे दोन वर्ष सण उत्सवांवर सावट होते.यंदा वीरांची मिरवणूक,धुळवडीचा उत्साह जोरदार साजरा करण्यात आला.
बाशिंगाच्या वीरांची जूनी परंपरा शहरात आहे.मिरवणूक बुधवार पेठ,चव्हाटा संभाजी चौक,तांबट गल्ली,मेनरोड,रविवार कारंजा आदी ठिकाणाहून गोदाघाटावर रात्री बारा वाजता येते परतीच्या मार्गावरही पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरी नेली जाते.पाचव्या दिवशी रहाड खोदून पुजा केली जाते.
रहाडीत रंगपंचमी खेळली जाते.
सागर बांडे