मालेगावचा कृषी पर्यवेक्षक लाच स्वीकारताना जाळ्यात

मालेगावचा कृषी पर्यवेक्षक
लाच स्वीकारताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मालेगाव येथील कृषी  पर्यवेक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सुधाकर विश्‍वनाथ सोनवणे असे या पर्यवेक्षकाचे नाव आहे. तक्रारदाराच व त्यांचा भाऊ  यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( पोकरा स्कीम) अंतर्गत ठिबक सिंचनसाठी लाभार्थी म्हणून निवड करण्यात आलेली आहे.  योजनेच्या अटीनुसार तक्रारदार व त्याचा भाऊ यांनी त्यांचे कुटुंबाचे  शेतजमिनीवर फळबाग लागवड करून ठिबक सिंचनाचे काम केलेलं आहे. सदर ठिबक सिंचनाचे कामाचे फाईलची तपासणी करून बिले  ऑनलाईन अपलोड करणेसाठी आरोपी लोकसेवक  यांनी तक्रारदाराला प्रत्येक फाईलचे एक हजार असे दोन हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक  नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना भोये बेलगावकर, पो. हवा चंद्रशेखर मोरे                                                    पो. हवा. सचिन गोसावी,पो. हवा. प्रफुल्ल माळी.
पो. ना विलास निकम,पो ना संदीप बतिशेपो. ना चां.परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *