नाशिक, : प्रतिनिधी
नॅब महाराष्ट्र, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ( नॅब ) सावंतवाडी व नॅब नेत्र रुग्णालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब रुग्णालय सावंतवाडी येथे सर्व सोयींनी सोयी सुविधांनी युक्त अशा नेत्र रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा दि. ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या रुग्णालयाचे उद्घाटन उद्योजक भावेश भाटिया यांच्या हस्ते होणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, सचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बी.एस. नागरगोजे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन
डॉ. श्रीरंग फाटक, डॉ. नेमिनाथ खोत, डॉ. मिताली शहा यांच्या वतीने करण्यात आले आहे.