ऐन उन्हाळ्यात पावसाची हजेरी

 

नाशिक  : राज्यात ऐन उन्हाळ्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुन्हा आता हवामानखात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 48 तासांत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला, नागपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता असून, पुढचे 24 तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, गोवा, पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तरप्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून, अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या शहरांमध्येही पावसाची शक्यता आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *