लासलगावी अवकाळी पावसाने झोडपले

लासलगाव: समीर पठाण

लासलगाव शहरात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास
अवकाळी पावसाने हजेरी लावली.रविवारचा आठवडे बाजार असल्यामुळे परिसरातील गावातून भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची व नागरिकांची काही काळासाठी धावपळ उडाली.या वेळी वीजप्रवाह देखील खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला उन्हाळ कांदा,गहू,कांदा बियाणे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अचानक आलेल्या पावसामुळे उघड्यावरील कांदे तसेच गहू झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून नागरिकांना थोड्या वेळ का होईना दिलासा मिळाला. हवामानातील बदलामुळे शेती पिकांना फटका बसत आहे.अशातच हवामान खात्याने पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सध्या कांदा गहू,हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे.अशातच अवकाळी पाऊस आल्याने पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *